लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 1]
आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट काय आहे, यावर त्याची यशस्विता आणि वृद्धी अवलंबून असते. व्यवसायाचे उद्दिष्ट, केवळ घर संसार चालवण्यासाठी पैसे मिळवणे किंवा, सुखासीन आयुष्यासाठी पैसे मिळवणे, एवढेच मर्यादित असेल, तर अर्थात आपण केवळ त्यामागे धावत राहतो. आणि एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुख प्रमाणे दोन महिन्यांची तोंडे जुळवता जुळवता त्याला नाके नऊ येतात.