लघुउद्योग 'लघु' च का राहतात ? [भाग 1]
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
महाराष्ट्रातील MSME हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. NSS 73 व्या फेरीच्या सर्वेक्षणाचा दाखला देत FY21 च्या वार्षिक अहवालानुसार, महाराष्ट्रात सुमारे 4 दशलक्ष MSME आहेत. ज्यात 10 दशलक्ष लोकांना रोजगार आहे. खरेतर, 'अतिलघु' [MICRO], या स्वरूपात सुरू झालेला उद्योग, 'लघु' [SMALL], आणी नंतर, 'मध्यम' [MEDIUM] उद्योग, असा वृद्धिंगत व्हायला हवा. परंतु असे होताना फारच कमी दिसते. किंबहुना कोविड सारख्या महामारी मध्ये मायक्रो युनिटचा मृत्युदर देखील वाढतो. MICRO युनिट्स ना पाच करोड टर्नओव्हरचा टप्पा ओलांडून SMALL युनिट म्हणवून घ्यायला, आणि SMALL युनिट ना, 50 करोडचा टप्पा ओलांडणे, कित्येक वर्षे उद्योग करून देखील शक्य होताना दिसत नाही. असे का होत असावे?
मला वाटते, आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट काय आहे, यावर त्याची यशस्विता आणि वृद्धी अवलंबून असते. व्यवसायाचे उद्दिष्ट, केवळ घर संसार चालवण्यासाठी पैसे मिळवणे किंवा, सुखासीन आयुष्यासाठी पैसे मिळवणे, एवढेच मर्यादित असेल, तर अर्थात आपण केवळ त्यामागे धावत राहतो. आणि एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुख प्रमाणे दोन महिन्यांची तोंडे जुळवता जुळवता त्याला नाके नऊ येतात. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ते दहा-पंधरा तारखेपर्यंत लोकांचे पगार, कर, बिले, यांचे टेन्शन त्याला राहते. याशिवाय कामगारांची गैरहजेरी, सप्लायर चा पैशांसाठी तगादा, आणि कस्टमर कडून येणाऱ्या पैशासाठी याचना असे आजार तर सर्दी पडश्यासारखे नेहमीच राहतात 1-2 कोटी, वार्षिक टर्नओव्हर मध्ये तरंगणाऱ्या अनेक मायक्रो युनिटस ना हा अनुभव असेल. त्या वरच्या युनिट्सला हा प्रॉब्लेम नसतो असे नाही परंतु मायक्रो युनिट्स मध्ये हा प्रॉब्लेम अधिक आढळतो.
याउलट मर्यादित उद्दिष्ट असणारे, कित्येक मायक्रो उद्योग मला असेही भेटले आहेत की, ते वर्षानुवर्षे सुखासीनतेत चालू असतात. सहसा त्यांच्या व्यवसायामध्ये, कस्टमर कडून येणारे पैसे वेळेत येणे, सप्लायरला वेळेत पेमेंट होणे, कामगारांचे पगार, बिले, कर वेळेत भरले जाणे, हे देखील चालू असते. दहावीत गेलेला मुलगा नीट अभ्यास करत नसल्याचे टेन्शन, जेवढे एखाद्या मध्यमवर्गीय बापाला असेल, तितपत टेन्शन, अशा प्रकारच्या उद्योजकाला, त्याच्या उद्योगांमध्ये असते. आणि ते तो लगेच चेहऱ्यावर वागवत देखील असतो. असे मायक्रो लेव्हलचे तीन चार
कोटी वार्षिक व्यवसाय करणारे व्यावसायिक, हे सुखाने कालक्रमणा करत असतात. खरे तर ते उद्योजक नसून स्वतःच्याच व्यवसायात उद्योग प्रमुख म्हणून नोकरी करत असतात. दर महा मिळणारे एक लाख- दोन लाख पगाराच्या स्वरूपात घरी येत असल्यामुळे, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे, असे उद्योजक सुखात असतात. आणि त्यात काही चुकीचे देखील नाही. विशेषतः त्यांची व्यवसाय वृद्धी देखील दरवर्षी थोड्याफार प्रमाणात कासवाच्या गतीने होत असते, आणि सगळं कसं छान चाललेलं असतं.
खरे तर कोणत्याही व्यवसायाचे उद्दिष्ट, हे 'समृद्धी' निर्माण करणे असे असायला हवे. उदाहरण दाखल जर आपण आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट दरमहा काही लाख रुपये मिळवणे असे ठेवले असेल, तर आपण आपला फोकस त्या पुरताच मर्यादित ठेवतो. परंतु जर का आपले उद्दिष्टच मोठे असेल तर व्यवसाय वृद्धीकडे कडे आपण नक्कीच मार्गस्थ होऊ शकतो. म्हणजे जसे की, मी तयार करत असलेला माल, मी, महाराष्ट्रभर किंवा भारतभर किंवा जगभर विकणार आहे. आता अशा प्रकारचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर नक्कीच अधिक धडपड करावी लागते आणि फोकस त्यावरच राहतो.
मुळातच अतीलघु उद्योगाची सुरुवात ही बहुदा, पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून होत असते. एखादी वस्तू आपल्याला तयार करता येते, हे एखाद्याला कळते, आणि मग ती वस्तू तयार करण्यासाठी तो छोटासा कारखाना उभा करतो. अर्थात मी हे उद्योजक किंवा इंग्रजीमध्ये एंटरप्रेन्युअर, याविषयी बोलतो आहे. बिजनेसमन कोणत्याही प्रकारचा बिजनेस करेल. मग तो ट्रेडिंग देखील करेल. परंतु एंटरप्रेन्युअर, हा सहसा काही ना काही मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये इंटरेस्टेड असतो. तो ज्या विषयात टेक्निकली साऊंड असतो, त्या विषयांमध्ये त्या वस्तू बनवून विकणे, यात त्याला एक प्रकारचे टेक्निकल सॅटिसफॅक्शन मिळत असते. आणि त्या समाधानासाठी तो सारे कष्ट उपसतो. एकदा का सुरुवातीची धडपड संपून, दरमहा काही रक्कम खिशात पडू लागली, की तो स्थिरावू लागतो आणि थोडेफार आपल्या घर संसाराकडे लक्ष देऊ लागतो. मग पैसे आले की, बंगला, गाडी, मुलांचे उच्च शिक्षण, या सगळ्या गोष्टींकडे त्याचे धावणे आपोआपच सुरू होते. महागातली गाडी घेण्यासाठी तो कर्ज देखील काढतो. आता त्याच्या उद्योगाला एक स्थैर्य आलेले असते.
अति लघु आणि लघु उद्योग यांची वाढ, या अशा एका लेव्हलला येऊन खुंटते. खुंटलेले उद्योग हे बरेचदा त्या उद्योजकाच्या हयातीतच किंवा पुढच्या पिढीत संपण्याची शक्यता असते. एका स्थैर्याला आल्यानंतर, त्यामधून मिळणारे उत्पन्न, हे समाधान देऊ लागते. तशी त्या उद्योजकाच्या मनात आळसाची निर्मिती होऊ लागते. आणि मग त्याला तो 'भीती' किंवा 'माईंडसेट' अशी नावे देऊ लागतो. तसेच तो व्यवसाय वृद्धी खुंटण्यासाठी, आपल्या कर्मचाऱ्यांना दोष देऊ लागतो. खरे तर व्यवसाय त्यानेच निर्माण केलेला असतो, व व्यवसाय वृद्धी करणे, तो नेटकेपणाने आणि नेटाने चालवणे, हे त्याचेच ध्येय असायला हवे, नाही का? परंतु असे ध्येय आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाही याचे वैषम्य वाटून घेण्यात व व्यक्त करण्यात त्याला बरे वाटू लागते. आणि त्यातूनच एका 'औद्योगिक आळसा' ची निर्मिती होत असते.
औद्योगिक आळस वाढण्याचे आणखी एक कारण असावे असे मला वाटते, ते म्हणजे उद्योजकाची अल्पसंतुष्ट वृत्ती, कूपमंडूक वृत्ती. जेवढे मिळते आहे त्यात समाधान मानायच्या वृत्तीमुळे अधिक काही मिळवण्याची 'हाव' नाहीशी होते. असे उद्योजक स्थिरस्थावर झाल्यावर स्वतःच्याच कारखान्यात नोकरी करू लागतात आणि अध्यात्म वगैरेच्या मार्गाला लागतात. बरेचदा लघुउद्योजकांनी इतर जग पाहिलेले नसते किंवा पहायचे टाळलेले असते. आणि मग ' त्यांचं वेगळं आहे ' आणि माझं वेगळं आहे अशी मनाची समजूत करून घेऊन, ते आपला लघुउद्योग आपल्या छोट्याशा संसाराप्रमाणेच सांभाळू पाहतात. आणखी एक कारण म्हणजे व्हीजन ब्रॉड नसणे, महत्त्वकांक्षा नसणे. इतरांच्या कारखान्यात जाणे, त्यांचे कारखाने पाहणे, त्यामध्ये काय नाविन्यपूर्ण आहे, काय अधिक फायदेशीर कृती ते करतात, त्या समजून घेणे त्या गोष्टी आपल्या उद्योगात देखील अमलात आणणे, यासाठी असे लोक सहसा प्रयत्न करत नाहीत.
मित्रांनो, यात तुम्ही कुठे आहात? तुमच्या व्यवसायाचे उद्दिष्ट मर्यादित आहे की, तुम्ही काही अमर्यादित करण्यासाठी झेप घेऊ पाहता? तुम्हाला तुमचा व्यवसाय 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी असा असावा अशी इच्छा, नव्हे 'लालसा' आहे काय ? तरच पुढील भाग वाचा.
.... ... .. .

Found this useful? Talk to us about your own factory plan.