॥ औद्योगिक अंधश्रद्धा ॥ ( भाग 2 )
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
भ्रमणध्वनी : 9822390363 | minish@leansigmasolutions.in
] WIP [
अर्धवट तयार झालेल्या मालाला 'वर्क इन प्रोग्रेस' म्हणणे, ही एक फार मोठी अंधश्रद्धा आहे. स्वतःचीच फसवणूक आहे असे मला वाटते. खरे तर ते 'वेटिंग इन प्रोसेस' आहे. WIP हा शब्द, RIP 'रेस्ट इन पीस', अशा अर्थाने देखील एका ठिकाणी वापरावा लागला होता. इतके दिवस अर्धवट प्रोसेस केलेला माल पडून होता.
कारखान्यात WIP का क्रिएट होते, याची काही प्रमुख कारणे आपण पाहू,
1) कोणताही प्रॉडक्ट, विशेषतः मशीनिंग किंवा असेंबली प्रॉडक्ट, तयार होण्यासाठी रॉ मटेरियल वेगवेगळ्या मशीन वरून किंवा प्रोसेस मधून जात असते. या साऱ्या प्रोसेस मधून जाताना, जर का प्रत्येक प्रोसेसचा ताशी प्रोडक्शन रेट, (60 minuits÷cycle time) जर समान किंवा जवळपासचा नसेल, तर WIP क्रियेट होत असते. ज्या मशीनचा किंवा प्रोसेसचा पर अवर रेट अधिक त्या मागे
WIP साठू लागते.
2) काही वेळा एकच मशीन, दोन-तीन वेगवेगळ्या प्रोसेस साठी वापरले जाते, तेव्हा देखील अशा प्रकारची WIP क्रियेट होत असते. अर्थात एक ऑपरेशन करून मटेरियल साठवायचे, आणि मग पुरेसे साठले की, त्याच मशीन वर त्याच मटेरियल वर पुढचे ऑपरेशन करायचे.
3) बरेचदा एखाद्या मशीनचा प्रोडक्शन रेट हा खूप जास्त असतो, अशा वेळेस मशीन बंद राहू नये, म्हणून देखील त्या मशीन वरची प्रोसेस कम्प्लीट करून ठेवली जाते.
4) किंवा ऑटो पार्टस प्रेस शॉप मध्ये बरेचदा असेही होते की, दोन-तीन ऑपरेशन झाल्यानंतर, कस्टमरच्या अर्जन्सीमुळे तो पार्ट काढून ठेवला जातो. आणि दुसरा पार्ट लावला जातो. आणि नंतर आधी चालू असलेला पार्ट पुढच्या ऑपरेशन साठी त्या मशीनवर चालवायला वेळच मिळत नाही. अशावेळी देखील WIP साठत राहते.
ज्या प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग साठी, मशीनिंग किंवा प्रेस शॉप ऑपरेशन होत असते,सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी, अशा प्रकारे WIP साठत राहते. मात्र ज्या ठिकाणी असेंबली करून प्रोडक्शन केले जाते, त्या ठिकाणी इनकंप्लीट बिल ऑफ मटेरियल हे WIP साठण्याचे कारण असते.
अशा विविध कारणांनी तयार होणारी WIP, ही खरे तर
इन्व्हेंटरी आहे. वाढती इन्व्हेंटरी ही कधीही धोकादायकच असते. त्याची कारणे आपण पुढील काही लेखात पाहूच. परंतु इन्व्हेंटरी, रॉ मटेरियल किंवा फिनिश्ड गुडस् या स्वरूपात असेल, तर ती कोणत्याही वेळी किमान विक्री योग्य असते. परंतु WIP ही मात्र विक्री योग्य राहत नाही. फायनल मशीनिंग न झालेले पार्ट्स, किंवा दोन-चार पार्ट्स जोडायचे राहिले आहेत अशा असेंबलीज् या विक्री योग्य नसतात. म्हणून ती जास्त धोकादायक. (बँकेसाठी म्हणून बरेचदा अशा WIP ची किंमत देखील व्हॅल्यू ॲड करून वाढलेली दाखवण्यात येते. परंतु त्याला काही अर्थ नसतो, आणी हे बँकेला देखील ठाऊक असते.)
वर दिलेल्या तीनही कंडिशन मध्ये, बहुतेकदा 'याला पर्याय नाही' अशीच समजूत असते. ही समजूत मात्र चुकीची मानवी लागेल.
एका ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीची पेन होती की, "कपॅसिटी फुल्ली युटीलाइज होत नाही. कॅपॅसिटीच्या हार्डली 60% प्रोडक्शन निघते. त्यामुळे रोजच डिस्पॅच ची घाई असते. काही वेळेस कस्टमर कडून पेनल्टी देखील बसते." त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, "कामगार वेळेत न येणे, कामचुकारपणा करणे, यामुळे हे होत असावे. कारखान्यातील HR मॅनेजर कॅपेबल नाही. त्याला बदलावे
लागेल. आणि हो लेआउट देखील बघावा लागेल. जागा अजिबात पुरत नाही. गैंग्वेज मध्येच नाही तर, कंपनीच्या आवारात देखील मटेरियल पडलेले असते. अनेकदा महिन्याचा सेल झालेल्या स्टॉक पेक्षा WIP स्टॉकच अधिक असतो. याचाच अर्थ भांडवल अडकून राहिलेले असते आणि जागा देखील. एकदा तुम्ही(च) बघून सांगा काय करायचे ते !"
वेगवेगळे टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, चे ऑटो पार्टस मॅन्युफॅक्चर करणाऱ्या खूप सार्या कंपन्यांमध्ये, मी पाहिले आहे की, त्यांच्याकडे रोजचे प्रोडक्शन प्लॅनिंगच मुळी WIP Stock वर ठरते. म्हणजे एखाद्या पार्ट वर जर पाच ऑपरेशन झाली असतील तर, त्यावर ते शेवटचे म्हणजे, सहावे ऑपरेशन मारून घ्यायचे. दोन ऑपरेशन झालेले पार्टस, तिसऱ्या ऑपरेशन साठी सातव्या मशीनवर लावायचे. आणी तीन ऑपरेशन झालेले पार्टस, उद्या लावू. कारण आज मशीन फ्री नाही. साधारण अशाप्रकारे.
शिफ्ट वर आलेला 'प्लांट हेड' नावाचा माणूस, रोज आल्या आल्या WIP मोजतो. म्हणजे अंदाजे मोजतो. म्हणजे एखादा तीन ऑपरेशन होऊन वेट करणारा पार्ट 2000 नग, 2 ऑपरेशन झालेले काही पार्ट, चार ऑपरेशन झालेले काही पार्ट, असा सगळ्याचा स्टॉक घेतो. (अर्थात नुसता डोळ्याने ! कंटेनरचा साईज आणि पार्ट्स ची संख्या हे
अनुभवाने त्याच्या नजरेत फिट झालेले असते) आणि ठरवतो कुठल्या मशीनवर काय लावायचे ते. जेव्हा कस्टमर कडून कॉल येतो, त्यावेळेस अचानकपणे मशीनवर लावलेली डाय बदलून तिसरीच डाय लावावी लागते. असे दिवसभरामध्ये, सहज तीन चार मशीन वर, तीन-चार वेळा तरी सेटिंग बदलले जाऊ शकते. यामुळे कमी अधिक ऑपरेशन्स संपलेले मटेरियल, काढून ठेवून, दुसऱ्याच पार्ट चे सेटिंग लावावे लागते. अर्थात अशा अर्धवट बाळसे धरलेल्या बाळाचे, WIP असे गोंडस नामकरण होऊन जाते.
तुम्हाला आठवत असेल, लहानपणी आपण, "माझ्या आईचे पत्र हरवले" असा एक खेळ खेळायचो. त्यामध्ये ज्या मुलाच्या पाठीमागे पत्र टाकले जाईल, त्या मुलाला काहीतरी ऍक्टिव्हिटी करून दाखवावी लागे. अशा प्रकारच्या कारखान्यात देखील हेच घडते. दिवसभरात येणारा कस्टमरचा कॉल, हा कुठल्याही मशीनवरचे प्लॅनिंग किंवा सेटिंग, दिवसभरात कधीही बदलू शकतो. आणि हे एक प्रमुख कारण असते की, ज्यामुळे WIP ला पर्यायच नाही अशी मानसिकता होऊन जाते. अर्थातच यासाठी कस्टमर दोषी असतो ! ( असेच मानले जाते) आणि CUSTOMER IS 'WIFE' NOT GOD ! त्याच्यासमोर आपले काही चालत नाही. या कारणाने जेवढे प्रोडक्शन, कपॅसिटी प्रमाणे व्हायला हवे, तेवढे कधीच निघू शकत नाही. आणि WIP
मात्र असाध्य रोगाप्रमाणे शरीर भर (कारखाना भर) पसरत राहते.
कित्येक वेळा तर एखाद्या मशीनचा प्रोडक्शन रेट जास्त असल्याने, त्या मशीन वरचे खूप सारे पार्ट्स तयार करून ठेवलेले असतात. आणि हे पार्ट शेकडो, काही वेळेला हजार भर देखील करून ठेवले जातात. आता अशा प्रकारची WIP कारखान्यात सर्वत्र विखुरलेली राहते. कारण अशी WIP रोजच तयार होत असल्याने, विविध पार्टस चे विविध अवस्थेतील WIP ठेवायला नेटकी आणि योग्य जागा करता येत नाही. किंबहुना केली तरी, ती मेंटेन होत नाही. कारण कधी कुठले पार्ट्स कमी जास्त तयार होतील, किंवा कमी जास्त मागणी येईल, याच्यावर सहसा नियंत्रण नसते.
वर वर्णन केलेल्या कारखान्याचे हे लक्षण, प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये प्रॉब्लेम असल्याचे दर्शविते, HR चा नाही. कारखाना भर पसरलेले मटेरियल अर्थातच WIP असते. विजिट केली तेव्हा, खरोखरच वेगवेगळ्या मोठाल्या लोखंडी डब्यांमध्ये, पोत्यांमध्ये, आणि पार्ट्स एकमेकांवर रचून ठेवलेल्या ढिगल्यांमध्ये, WIP सर्वत्र पसरली होती. मागील बारा महिन्यांचा, पार्ट वाईज प्रोडक्शन डेटा, पर पार्ट कॅपॅसिटीशी पडताळून पाहिला. तर, खरोखरच 60- 65 टक्के कपॅसिटीने प्रोडक्शन सुरू होते, असे दिसले.
अशी परिस्थिती सुधारण्या साठी नक्कीच पर्याय असतात. परंतु त्यात सातत्य ठेवणे खूप गरजेचे असते. अर्थात या सातत्यामुळे होणारा फायदा, हा नेहमीच अधिक असतो. आणि मनस्ताप देखील टळतो.
आम्ही त्यांच्या सर्व पार्ट्स च्या परअवर रनरेट प्रमाणे, दोन तासाची एक बॅच, या हिशोबाने छोट्या छोट्या बॅचेस ठरवल्या. तसेच तयार करत असलेल्या पार्टस् च्या, विक्रीच्या संख्येवरून, रनर, रिपीटर आणि स्ट्रेंजर पार्टस ठरवले. रनर पार्ट्स म्हणजे रोज लागणारे, रिपीटर म्हणजे आठवड्यातून एक दोनदा लागणारे, व स्ट्रेंजर म्हणजे महिना दोन महिन्यातून कधीतरी मागवले जाणारे पार्ट्स. त्याप्रमाणे रनर पार्ट ज्या मशीनवर मशीनिंग होतात, त्यांचा एक ग्रुप केला. तसेच रिपीटर आणि स्ट्रेंजर पार्ट तयार होणारी मशीनस्, दुसऱ्या ग्रुपमध्ये घेतली. वर्कप्लेसच्या लेआउट मध्ये, या ग्रुप्स प्रमाणे, मशीन एकमेकांच्या जवळ आणून ठेवली. ( यामुळे दोन मशीन मधील पार्टस् ची वाहतूक सोपी होणार होती) आता यातील कुठल्या पार्टच्या, किती बॅचेस केव्हा रन करायच्या, याचा एक विकली प्लॅन बनवला. त्यात देखील नियम असा की, कोणत्याही पार्टवर पहिले ऑपरेशन केले तर, सिरीयली सर्व ऑपरेशनस् करून, पार्ट फिनिश करायचा. मधल्या आधल्या ऑपरेशन वरून खाली उतरवायचा नाही. प्लॅन बनवताना ही काळजी घेतली की,
ज्या मशीनवर सेटअप चेंज करायचा आहे, तो छोटी बॅच पूर्णपणे संपल्याशिवाय करायचा नाही. आणि शक्यतो जेवणाच्या सुट्टीत, किंवा शिफ्ट संपतानाच करायचा. आणि महत्त्वाचे म्हणजे, कस्टमरच्या फोनने हायपर होऊन, कोणत्याही मशीन वरचा 'आजचा' प्लॅन कधीच बदलायचा नाही. कस्टमरचा फोन आला म्हणून घाई घाईने हाइपर होऊन, कुठल्याही मशीन वरचे सेटिंग, मधे-आधे बदलायचे नाही. कस्टमर ने कितीही घाई केली, तरी त्याला देखील ठाऊक असते, की असे कुठलेच पार्ट्स हे लगेच तयार होऊ शकत नाहीत. जावई पाहुणा आला म्हणून, रेड्याची धार काढता येत नाही. दोन तासाचा पूर्ण वेळ वापरून एकेक बॅच कम्प्लीट झाल्यामुळे, प्रोडक्शन देखील कपॅसिटी प्रमाणे मिळणार होते.
रनरेट प्रमाणे आणि न थांबता प्रोडक्शन होत असल्यामुळे, मध्ये मध्ये सेटअप चेंज करावे लागत नसल्यामुळे, ओघानेच प्रोडक्शन वाढले. आणि कपॅसिटीच्या दरम्यान उत्पादन मिळू लागले. रनर-रिपीटर पार्ट्स ठरवताना, तो कस्टमरच्या डेली डिमांड वर कॅल्क्युलेट केल्या मुळे, जो माल तयार होईल, तो त्याच दिवशी किंवा किमान दोन दिवसांमध्ये बाहेर पडत असे. आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व पार्ट्स फिनिश्ड कंडिशन मध्येच असल्यामुळे, कस्टमरचा प्लॅन वर खाली झाला, तरी त्याचा इम्पॅक्ट, हा प्रोडक्शन वर होत नाही. टारगेट 'WIP झिरो' हे ठेवून हे काम जेव्हा केले, तेव्हा
आपसूकच काही महिन्यात, कारखाना मोकळा मोकळा दिसू लागला. आणि कपॅसिटी मॅक्झिमम युटीलाइज होऊ लागली.
अर्थात, हे इतके सोपे नाही. यासाठी अशा प्रकारचे बदल करून बघायची मानसिकता, आणि धाडस, उद्योजकांमध्ये नक्कीच हवे. होते काय, की 60-70% रेडी अवस्थेमध्ये, म्हणजेच WIP अवस्थे मध्ये मटेरियल असेल, तर कस्टमरच्या डिमांड प्रमाणे, पुढची एक दोन ऑपरेशन्स मारून, माल लवकर पाठवता येतो, ही समजूत इतकी खोलवर रुजली आहे की, प्रोडक्शन इंजिनियर्स काय पण, उद्योजक देखील, हे धाडस करायला धजावत नाहीत. WIP ठेवण्यापेक्षा फिनिश्ड कंडिशन मध्ये पार्ट्स ठेवले तर काय हरकत आहे? परंतु अशा केस मध्ये, कस्टमरला दोषी ठरवून WIP वाढत राहते. आणि कस्टमर कडे बोट दाखवले की, 'आहे तसं चालू राहील' हे रेस्ट हाऊस इतकं सुखावह असतं की, अशा समजुती मोडायची तयारी नसते. कदाचित यामुळेच ही अंधश्रद्धा वर्षानुवर्षे घट्ट रुजली असावी, बरोबर ना ?
.... भाग 2 समाप्त |
(या ललें मध्ये दिलेली उदाहरणे, ही माझ्या कामात विविध ठिकाणी मला आलेले अनुभव आहेत. फक्त नावे टाळून ती
दिली आहेत. तुम्हाला हे लघुलेख जर आवडत असतील, तर जरूर लाईक, कॉमेंट आणि शेअर करा 😊🙏)

Found this useful? Talk to us about your own factory plan.