॥ औद्योगिक अंधश्रद्धा ॥ ( भाग 3 )
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
भ्रमणध्वनी : 9822390363 | minish@leansigmasolutions.in
] मराठी माणूस काम करत नाही [
एखादे लहान मुल हट्टी आहे, असे जर नेहमीच म्हणत राहिले, तर ते ऐकून ऐकून आपोआप ते हट्टी होण्याचीच शक्यता संभवते. तसंच जर ते मुल फार गुणी आहे, असे म्हणून जर त्याचे कौतुक, लहानपणापासून करत राहिले, (अर्थात डोक्यावर न बसवता 😁) तर ते मूल गुणी होण्याच्या शक्यता निर्माण होतात. असे आधुनिक बाल मानसशास्त्र सांगते. (अगदी आमच्या वेळी असे नसले) तरी ते खरेच आहे. आणी याचा अनुभव, तुम्ही देखील घेत असाल.
मराठी माणसाच्या बाबतीत काहीसे असेच होत असावे. मराठी माणूस आळशी आहे, अशी एक समजूत, आपण परत परत बोलून, नाहक दृढ करत चाललो आहोत. आणि कदाचित त्या कारणाने, मराठी माणूस खरंच अधिक आळशी बनण्याची शक्यता वाटते, म्हणून हा उहापोह !
मला वाटते, मराठी माणसाच्या 'आळशी' असण्याच्या, कामात 'टाळाटाळ' करत असल्याच्या, त्याच्यात 'व्यावसायिक' मानसिकता नसल्याच्या, समजुती बहुदा खूप काळापासून रुजल्या आहेत, किंवा रुजवल्या गेल्या असाव्यात. या विशेषतः कामगारांच्या बाबतीतल्या आहेत. दुकान मारवाड्याला विकून, 'मराठी माणूस धंद्यात मागे का?' यावर भाषणे ठोकणारी मराठी माणसे, आता नाहीशी झाली. मराठी उद्योजकांनी ही समजूत आता मोडीत काढली आहे.
कारखान्यातील मराठी कामगार किंवा, अगदी घरगुती कामासाठी बोलावला गेलेला मराठी सुतार, प्लंबर, इत्यादी, नीट काम करत नाहीत. वेळेत करत नाहीत. अशी समजूत हळूहळू पसरत गेली असावी. आणि मग तसेच छोटे-मोठे अनुभव आल्यानंतर, या समजूती अधिकाधिक दृढ आणि सार्वत्रिक होत गेल्या असाव्यात कदाचित. आणि एकदा कानफाट्या नाव पडले की पडले, असं तर झालं नाहीये ना ? याचा खरंच विचार व्हायला हवा असे मला वाटते.
गेल्या दहा पंधरा वर्षापासून पर राज्यातील कामगार, फार मोठ्या प्रमाणात, महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये पसरला. आणि बहुदा तेव्हापासूनच मराठी कामगाराविषयीच्या तक्रारी वाढू लागल्या. कारण सरळ सरळ कम्पॅरिझन होऊ लागली. अगदी पहिली कम्पॅरिझन म्हणजे, अमराठी
कामगार 12 तास काम करतो, आणि मराठी कामगार आठ तासानंतर ओव्हरटाईम ला देखील थांबायला तयार नसतो. सुरुवातीला जेव्हा अमराठी कामगार, कामधंद्याच्या शोधात महाराष्ट्रात आला, तेव्हा तो मिळेल त्या पगारात, बारा बारा तास काम करायला उपलब्ध होता. एकदा तो स्वतः कामाला लागला, की तो आपले इतर नातेवाईक, गाववाले, यांची टोळी येथे कामाला आणू लागला. आणि इथल्या कारखानदारांना, कारखान्यांमध्ये बारा-बारा तास काम मिळू लागले. काम सांगणे देखील सोपे होते. कारण त्यांच्या मुखियाला सांगितले, की तो त्या टोळी कडून काम करून घेत असे. वेळ पडेल तर, रात्री-अपरात्री देखील, हे लोक काम संपवून देत असत. कारण बहुतेकदा ते कारखान्याच्या आवारातच राहत असत. अजूनही असेच चालते. आणि अर्थातच, कोणत्याही कारखानदाराला हे अतिशय फायदेशीर वाटणारच. सहाजिकच हे अमराठी कामगार सर्वत्र पसरले. याबद्दल खरंतर कोणतीच तक्रार नाही. मुद्दा हा आहे की, 'मराठी कामगार आळशी आहे' ही समजूत सार्वत्रिक आणि दृढ व्हायला, हे कारण ठरले असावे का ?
विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, येथील हिंदी भाषिक कामगार, अगदी लहान मोठ्या साऱ्याच उद्योगांमध्ये दिसू लागले. कारखान्यातच नव्हे तर अगदी भाजीवाले, किराणा माल दुकानदार, हॉटेल यांच्याकडे देखील हिंदी भाषिक कामगार
दिसू लागले. तुम्हाला देखील जाणवत असेल की, आपली बोलीभाषा किती सहज बदलत गेली आहे. मराठी माणसाच्या कारखान्यात देखील, कामगारांशी हिंदीमध्ये बोलावे लागते. (हे लोक मराठी मात्र बिलकुल शिकत नाहीत. कामगारांना ट्रेनिंग देते वेळी, अगदी एक कामगार जरी अमराठी असेल, तरी ट्रेनिंगची भाषा हिंदी ठेवावी लागते, हा अनुभव मी खूपदा घेतला आहे.) गोव्यामधल्या एका कारखान्यात कन्सल्टन्सी करत असताना, ते कारखानदार म्हणाले की, "अहो, आम्ही आता मातृभाषा विसरायला लागलो आहोत. कारण कारखान्यामध्ये या लोकांसाठी कंपल्सरी हिंदीतच बोलावे लागते. पण काय करणार? आपल्या माणसांना कामच करायचे नाहीये."
मराठी कामगाराविषयी सहसा ऐकू येणाऱ्या तक्रारी खालील प्रमाणे,
1. कामावर वेळेवर येत नाहीत
2. न सांगता गैरहजर राहतात
3. मनापासून काम करत नाहीत
4. ओव्हर टाईम करायला तयार नसतात
अजून सांगाल काही ?
परंतु आता बरेचदा अमराठी कामगारांविषयी देखील काही तक्रारी ऐकू येऊ लागल्या आहेत, त्या देखील पाहूयात,
1. वर्षातून एक ते दोन महिने गावी निघून जातात. त्यावेळी प्रोडक्शन कमालीचे घसरते.
2. गावी गेल्यानंतर खूप वेळा फोन करून बोलावून घ्यावे लागते.
3. गावी गेलेल्या कामगारांची टोळी परत आपल्याकडेच येईल याची खात्री नसते.
4. ऍडव्हान्स घेऊन गावी जातात. आपले पैसे त्यांच्याकडेच अडकतात. परत आले नाही तर पैसे बुडले.
5. कित्येक वेळा त्यांना विमानाचे तिकीट देऊन बोलवावे लागते.
6. कामात मक्तेदारी व अरेरावी वाढली आहे.
7. रोज बारा तासांची शिफ्ट हवी असते आठ तासांची चालत नाही.
8. राहण्याची व जेवणाची (स्वयंपाक ते करतात परंतु किराणा आणून द्यावा लागतो) सोय करावी लागते.
9. कामाची जागा व राहण्याची जागा अस्वच्छ ठेवतात.
10. प्रोडक्शन व्यतिरिक्त इतर कामे सांगितल्यास काम करण्याची तयारी नसते.
11. गुटखा खाण्याचे व कामाच्या जागी थुंकण्याचे प्रमाण अतिशय आहे. आणि हो,
12. मराठी भाषा अजिबात शिकत नाहीत. त्यांच्याशी (आपल्या मोडक्या तोडक्या) हिंदीतच संवाद करावा लागतो.
बापरे ...!!
पर राज्यातील कामगार महाराष्ट्रात येण्याचे कारण, त्यांच्या इथे पुरेसे उद्योगधंदे नाहीत. ते इकडे पैसे मिळवायला म्हणूनच येतात. त्यामुळे त्यांची कुटुंबे तिकडे, आणि हे लोक इकडे, एकेकटेच किंवा समूहाने राहतात. अर्थातच त्यांना रोज संध्याकाळी घरी जाणे, किंवा घरची काही कामे करणे, हा विषयच उद्भवत नाही. अर्थातच ते लोक बारा बारा तास काम करतात. कारण त्यांना पैसे मिळवून घरी पाठवायचे असतात. त्यावर त्यांचे कुटुंब तिकडे चालत असते.
या उलट मराठी कामगार, हा स्थानिक असल्याने, त्याला घर-गृहस्थी, असल्यास शेती सांभाळावीच लागते. त्याचे कुटुंब त्याच्याबरोबरच राहत असल्याने, त्याला त्याकडे देखील लक्ष द्यावे लागते, ही बाब आपण विसरतो. पर राज्यातील कामगार, त्याच्या 'गाँवको' गेल्यावर महिना दोन महिन्याचा संपूर्ण वेळ, त्याच्या कुटुंबाला, कौटुंबिक कामकाज, लग्न, घर बांधणे, जमीन व्यवहार, इत्यादींना देतो.
आणि तरीही मराठी कामगाराने, वर्षभरात घेतलेल्या सुट्ट्या, या 30 किंवा 60 दिवस तर नक्कीच भरणार नाहीत. आणि घेत असलेल्या सुट्ट्या देखील, सलग महिना-महिना नसतात.
उचल मागतात परंतु, स्थानिक कामगाराचे तुम्हाला घर देखील माहिती आहे. आणि परराज्यातील कामगाराचा फक्त मोबाईल नंबर. तो बंद असेल, बदलला, तर कॉन्टॅक्ट संपला.
राहता राहिली बाब बारा तास काम करण्याची. खरंच तपासून बघा, रोज बारा तास काम करण्याची गरज आहे का ? आणि असेल तर काहीतरी चुकतंय. आणि बारा तास 'भरले' म्हणजे माणूस खरंच पूर्ण बारा तास काम करू शकतो का ? After office hours कारखान्यांमध्ये काय काय चालते हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का ?
या लेखाचा उद्देश परराज्यातील कामगार घेणे टाळावे, असे सांगण्याचा अजिबात नाही. भारताचा प्रत्येक नागरिक, त्याला हवे तिथे आणि हवे त्या प्रकारचे काम नक्कीच करू शकतो. याला काहीच हरकत असण्याचे कारण नाही. फक्त 'मराठी माणूस आळशी आहे' ही जी समजूत मराठी माणसाचीच झाली आहे, तिची सत्यासत्यता पडताळणे, एवढाच उद्देश ! तुम्हाला काय वाटते ?
.... भाग 3 समाप्त |
(या ललें मध्ये दिलेली उदाहरणे, ही माझ्या कामात विविध
ठिकाणी मला आलेले अनुभव आहेत. फक्त नावे टाळून ती दिली आहेत. तुम्हाला हे लघुलेख जर आवडत असतील, तर जरूर लाईक, कॉमेंट आणि शेअर करा 😊🙏)

Found this useful? Talk to us about your own factory plan.