॥ औद्योगिक अंधश्रद्धा ॥ ( भाग 4 )
- मिनिष उमराणी (औद्योगिक सल्लागार)
भ्रमणध्वनी : 9822390363 | minish@leansigmasolutions.in
] Incomplete BOM [
OEM- Original Equipment Manufacturing- प्रकारचे उद्योग, लघु, मध्यम, किंवा मोठे असले, तरी सर्वसाधारण प्रोसेस फ्लो समानच असतो. (OEM मध्ये तयार होणारे प्रोडक्टस् सहसा असेंबली प्रॉडक्ट असतात. जसे की जनरेटर, इन्वर्टर, गिअर बॉक्स, विविध प्रकारची मशीनस्, इलेक्ट्रिक उपकरणे, इत्यादी.) सेल्स ऑर्डर आली की, प्लॅनिंगचा किंवा प्रोडक्शन इंजिनियर, प्रोडक्शन ऑर्डर इशू करतो. आणि त्यावरून मटेरियल रिक्वेजीशन नोट स्टोअर्सला दिली जाते. स्टोअर्स, त्या MRN मधील जेवढे मटेरियल उपलब्ध असेल, तेवढे प्रोडक्शन साठी इशू करते. उरलेल्या मटेरियलची Purchase Order काढली जाते, ते मटेरियल दोन-चार दिवसात येईल, असे आश्वासन, परचेस इंजिनियर देतो. या आश्वासनावर सहसा कुणाचा विश्वास नसतो. परंतु पर्याय नाही, म्हणून मिळेल तेवढे मटेरियल घेऊन, प्रॉडक्टची असेंबली सुरू करण्यात येते. त्यामुळे असेंबली सुरू करण्यापूर्वी सहसा संपूर्ण BoM - बिल
ऑफ मटेरियल उपलब्ध नसण्याची शक्यता अधिक असते. अर्थात यात बरेच सारे प्रमुख पार्ट्स आलेले असतात. परंतु कित्येकदा, एखादा टिपिकल इलेक्ट्रॉनिक पार्ट, ऍक्च्युएटर, सॉलिनाॅईड वॉल्व, रिले, अशा प्रकारचे हाय व्हॅल्यू, किंवा हाय लीड टाईम वाले पार्ट्स उपलब्ध नसतात. कित्येकदा हार्डवेअर, जसे की काही स्पेशल नट बोल्ट, PTFE वॉशर्स, ऑईल सील देखील उपलब्ध नसण्याची शक्यता असते.
अशावेळी, हे पार्ट्स येतील, "तोपर्यंत बाकीची असेंब्ली तयार ठेवली, तर असे पार्ट्स आल्यावर, लगेच जोडून, लगेच dispatch करता येईल." या समजूतीने वर्षानुवर्ष अनेक कारखान्यात अशा प्रकारे प्रोडक्शन सुरू आहे. आणि अर्थात कोणीही म्हणेल की, यात काय चूक आहे, नाही का?
ही एक महान अंधश्रद्धा, गेले कित्येक वर्षे, 'प्रोडक्शन' मध्ये जीवापाड जपलेली मी पाहतो आहे. मी जितक्या लहान, मोठ्या OEM उद्योगांबरोबर काम केले आहे, त्या बहुतेक ठिकाणी ही अंधश्रद्धा जिवापाड जपणारे इंजिनियर्स मी पाहिले आहेत. गावातल्या बायका वटपौर्णिमेचा उपवास, जितक्या श्रद्धेने करतात, तितकीच बळकट श्रद्धा, याबाबतीत कारखान्यांमध्ये दिसते. वर्षानुवर्षापासून ही समजूत, प्रोडक्शन इंजिनिअर्सच्या मनात अगदी दृढ झाली आहे. या व्रताचा वारसा जुने जाणते इंजिनियर्स,नवीन जॉईन झालेल्या फ्रेशर्स ना, तितक्याच श्रद्धेने देतात, आणि ही
समजूत जोपासण्याचे कार्य पुढच्या पिढीसाठी चालू ठेवतात.
ही समजूत कारखान्यांसाठी अतिशय घातक आहे. परंतु अगदी कारखान्याच्या मालकांपासून, उच्चपदस्थां पासून, ते अगदी ज्युनिअर इंजिनिअर पर्यंत, ही समजूत फार दृढ झाली आहे. सहसा अशाच पद्धतींनी असेंबलीज करायची प्रॅक्टिस पडून गेलेली असते. व त्यात आपण काही वावगे किंवा चुकीचे करतो आहोत, असे वरपासून खालपर्यंत कोणालाच वाटत नसते.
अशा पद्धतीने असेम्ब्ली केल्यामुळे होणारे प्रमुख तोटे म्हणजे,
- मॅन्युफॅक्चरिंग लीड टाईम वाढतो
- फ्लोअर स्पेस मोठ्या प्रमाणावर लागते
- ऑन टाइम डिलिव्हरी फेल होतात
- इनव्हेंटरी (WIP) वाढते आणि ती वरचा इंटरेस्ट वाढत
राहतो
- आणि त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट देखील वाढते
100% BOM एकाच वेळी दिल्याने, मोठ्या प्रमाणावर फायदा झालेली, अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत. त्यातही निव्वळ एवढ्या एकाच कारणाने तुमचा, 'असेंबली
ऑन फ्लोअर' अर्थात मॅन्युफॅक्चरिंग टाईम, ड्रास्टिकली कमी होतो. आणि याबरोबर जर 'टॅक्ट बेस्ड असेंबली लाईन' सेट केली, तर कस्टमरच्या डिमांडला वेळीच रिस्पॉन्ड करून, शंभर टक्के ऑन टाईम डिलिव्हरी साधता येते. मॅन्युफॅक्चरिंग लीड टाईम कमी झाल्याने, वर्कप्लेसची कपॅसिटी आणी अर्थातच प्रॉडक्टिव्हिटी वाढते ती वेगळीच.
अगदी वर्षा-दीड वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अहमदाबाद मधल्या एका मोठ्या मशीन मॅन्युफॅक्चररने, मला विजिटसाठी बोलावले होते. त्यांचा ग्रीनफिल्ड लेआउट चा प्रोजेक्ट होता. म्हणजे थोडक्यात, त्यांनी दोन एकर जागा घेतली होती, व तेथे त्यांना त्यांचे सध्याचे, विविध ठिकाणी चालू असणारे मशीन्सचे प्रोडक्शन, शिफ्ट करायचे होते. ग्रीन फील्ड लीन लेआउट प्रोजेक्टमध्ये, वर्कप्लेस वरच्या मशिनरीज, प्रोसेस फ्लो, असेंबली स्टेशनस् , या सगळ्याचा आधी लेआउट तयार केला जातो, व नंतर त्या लेआउट प्रमाणे आर्किटेक्ट, सिविल कन्स्ट्रक्शन साठी डिझाईन बनवतो. आधी फॅक्टरी बांधून, मग त्यामध्ये मशिनरी सेट करण्यापेक्षा, हे सोपे आणि सोयीस्कर पडते. हल्ली खूप सारे उद्योजक, ही पद्धत वापरतात. मी जेव्हा त्यांच्याकडे प्रथम व्हिजिटला गेलो तेव्हा त्यांची मॅन्युफॅक्चरिंग ची पद्धती सर्वसाधारणपणे अशी होती,
सहसा ते, मशीनस् ची ऑर्डर आली की उपलब्ध स्टॉक
मधून विक्री करत असत. अशावेळी तीन-चार वेगवेगळ्या मशीनची एकत्र ऑर्डर आली, आणी त्यातील एखादे मशीन त्यांच्याकडे उपलब्ध नसेल, अशावेळी उपलब्ध नसलेल्या मशीनची बॅच कम्प्लीट होण्याची वाट पाहावी लागे. एक बॅच 20 मशीनस् ची असे. आणि ती पूर्ण व्हायला 30 दिवस लागत. ती बॅच कम्प्लीट झाल्यावर त्यातले एक किंवा दोन मशीनस् व इतर उपलब्ध असलेली मशीनस्, अशाप्रकारे डिस्पॅच केले जात असे. त्यामुळे अर्थातच स्टॉक असून देखील वेळेवर डिलिव्हरी करणे अवघड जात असे. दरमहा बहुदा अशाच प्रकारच्या परिस्थितीला त्यांना तोंड द्यावे लागे. आणि तयार मशीन चा देखील स्टॉक मोठ्या प्रमाणावर वाढत जात असे. स्टॉक मधील कित्येक मशीन तर, दोन दोन महिने विकली देखील जात नसत.
अशा प्रकारच्या 20-20 मशीनच्या, साधारण 30 बॅचेस एका वेळी चालू असत. आणि वेगवेगळ्या दिवशी त्या पूर्ण होऊन, फिनिश्ड गुड्स स्टॉक मध्ये जमा होत असत. आता अशा प्रकारे WIP आणी फिनिश्ड गुड्स यांचा किती स्टॉक होत असेल, याचा हिशोब तुम्हीच करा. अशा पद्धतीने प्रोडक्शन करण्याचे मूळ कारण, जे मला सांगण्यात आले, ते असे. त्या मशीनच्या बिल ऑफ मटेरियल मधील सारे मटेरियल एका वेळी उपलब्ध होऊ शकत नसे. काही पार्ट्स इम्पोर्टेड होते, तर काही पार्ट लॉंग लीड टाईम वाले. अर्थातच
साधारणपणे 70-80 टक्के एवढे BOM चे पार्टस् मिळाले की, मशीन असेंबली करायला घेत असत. जसजसे वेगवेगळे पार्ट उपलब्ध होत, तसतसे ते एकेका मशीनच्या बॅच साठी दिले जात असत. आणि अशी वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस होती.
अर्थातच जागा कमी पडत होती. म्हणूनच त्यांना नवी बिल्डिंग बांधायची होती. आणि त्यामुळे मनुफॅक्चरिंग लेआउट बनवण्यासाठी, त्यांनी मला बोलावले होते. सध्याचा त्यांचा वार्षिक टर्नओव्हर होता, 150 कोटी. अगदी पुढील पाच वर्षांचा विचार केला तरी, ते सहज 400 कोटी पर्यंत पोहोचू शकले असते. मग विचार करा, अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, त्यांना किती जागा, किती माणसे, आणि किती रॉ मटेरियल चा स्टॉक लागेल?
जेव्हा आम्ही 100% बिल ऑफ मटेरियल घेऊन, एक मशीन असेंबल करून पाहिले, तेव्हा लक्षात आले की, त्यासाठी लागणारा वेळ हा 8 तास आहे. याचाच अर्थ 100% BOM उपलब्ध असेल तर एक मशीन देखील असेंबल करता येऊ शकते. त्यासाठी वीस मशीनची बॅच सुरू करून ती तीस दिवस चालू ठेवायची गरज पडणार नाही. आणि अर्थातच 30 दिवसांमध्ये, एकच टीम, 30 मशीन्स, जोडून तयार करू शकते. आणि याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गरज नसताना, वीस मशीन तयार करून
ठेवून, त्यामध्ये पैसे अडकवून ठेवावे लागणार नाहीत. ऑर्डर प्रमाणे दोन किंवा तीन मशीन, किंवा दहा मशीन लागणार असतील, तर तेवढीच मशीन बनवणे, आणि उरलेल्या वेळात उरलेली मशीन बनवणे, देखील शक्य आहे. ही फ्लेक्सिबिलिटी देखील तेवढीच महत्त्वाची.
त्या मशीनस् चा TAKT TIME होता 2 तास. टॅक्ट टाईम याचा अर्थ, दिवसाचा उपलब्ध वेळ (8 तास) भागिले एव्हरेज डेली डिमांड. याचा लॉजिकल अर्थ दर दोन तासांनी एका मशीनची ऑर्डर येते. म्हणजेच दर दोन तासाने एक मशीन जर तयार करू शकलो नाही, तर ऑर्डर हातून जाण्याची शक्यता !
8 तासाचा एकूण सायकल टाईम, आम्ही दोन-दोन तास सायकल टाईमच्या 4 स्टेशन्स मध्ये विभागला. आणि त्या चारही स्टेशन्सना, त्यांच्या त्यांच्या ऑपरेशन स्टेप्स नेमून दिल्या. आता पहिले मशीन 8 तासानंतर, तर पुढील प्रत्येक मशीन दर दोन तासानंतर तयार होऊ लागले. परंतु यासाठी नियम एकच होता 100% बिल ऑफ मटेरियल उपलब्ध असल्याशिवाय लाईन सुरू करायची नाही. ही मानसिकता बदलणे खरोखरच अवघड होते. परंतु कंपनीच्या मॅनेजमेंटची तयारी होती. त्यामुळे त्यांनी दोन महिन्यातच, अशा पद्धतीने तयारी करून, टॅक्ट बेस्ड असेंबली लाईन
तयार केली. आता 100% बिल ऑफ मटेरियल उपलब्ध असल्यामुळे, या लाईनवर खरोखरच दर दोन तासानंतर एक मशीन तयार होऊ लागले. याचा अर्थ दर दिवशी पाच मशीन अतिशय कमी जागेत तयार होऊ लागले 30 दिवसांची कपॅसिटी झाली एकूण दीडशे मशीन्स. आणि महत्त्वाचे म्हणजे हवी ती दीडशे मशीन्स ! आणि महिन्याचा सध्याचा, त्या प्रकारच्या मशीन्सचा सेल, 50 ते 60 च्या दरम्यानचाच होता. आणि आणखी देखील महत्त्वाचे म्हणजे ही सारी असेंबली लाईन त्यांच्या फक्त एका फ्लोअर वर तयार झाली होती. उरलेले दोन फ्लोअर चक्क मोकळे झाले. आणि हो, त्या कंपनीला अर्थातच, काही कोटी रुपये खर्च करून, नवीन फॅसिलिटी तयार करण्याची गरजच राहिली नाही.
100% बिल ऑफ मटेरियल चा नियम, आणि टॅक्ट बेस्ड असेंबली लाईन, याचे फायदे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. स्पेस सेविंग, प्रॉडक्टीविटी आणि कपॅसिटी इन्क्रीज ! याशिवाय इन्व्हेंटरी कंट्रोल होणार ते वेगळेच. हे टेक्निक अजिबात नवीन नाही. सर्व प्रकारच्या टू व्हीलर, थ्री व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, हीच पद्धत वापरली जाते. आणि म्हणूनच आपल्याला पूर्वीसारखे, ॲडव्हान्स पैसे भरून, सहा-सहा महिने मोटरसायकलची वाट पहावी लागत नाही.
अर्थात उपलब्ध बिल ऑफ मटेरियल घेऊन, असेंबली चालू करून, उरलेल्या पार्ट्स ची वाट बघण्याची 'समजूत',
प्रोडक्शन इंजिनीयर च्या पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे. ती इतक्या सहजी मोडू शकत नाही. त्यासाठी मॅनेजमेंटची तितकीच तीव्र मानसिकता आणी पेशंस आवश्यक !
.... भाग 4 समाप्त |
(या ललें मध्ये दिलेली उदाहरणे, ही माझ्या कामात विविध ठिकाणी मला आलेले अनुभव आहेत. फक्त नावे टाळून ती दिली आहेत. तुम्हाला हे लघुलेख जर आवडत असतील, तर जरूर लाईक, कॉमेंट आणि शेअर करा !)

Found this useful? Talk to us about your own factory plan.